Chikhali Crime : विवाहितेचा छळ प्रकरणी सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरातील किरकोळ कारणावरून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात सात जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Chikhali Crime) हा प्रकार 13 जून 2021 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत चिखली येथे घडला.

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात रविवारी (दि.5) फिर्याद दिली असून अमीर शेख, कादीर शेख, जब्बर शेख व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Dhayari News : ‘आप’ ची पहिली पाणी परिषद धायरी गावात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना घरातील किरकोळ कारणावरून आरोपींनी शिवीगाळ व मारहाण केली तसेच घरी कोणी नसताना घरातील पुरुषांनी गैरवर्तन केले.(Chikhali Crime) घरात अपमानास्पद वागणूक देत मानसिक छळ केला. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.