Marunji Crime News : दुकानासमोर गाडी लावू नको म्हटल्याने दुकानदाराला हॉकी स्टिकने मारहाण, चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दुकानासमोर गाडी लावू नको असे म्हंटल्याने किराणा दुकानादाराला हॉकी स्टिक व लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (दि.11) दुपारी दोन सुमारास मारूंजी येथे ही घटना घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किराणा दुकानदार सुनिल गोपाराम सिरवी (वय 23, रा. राजमुद्रा पेट्रोलपंप शेजारी, मारूंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंटी (पूर्ण नाव माहीत नाही), एमएच 14 / डीक्यू 2409 या दुचाकीवरील मुलगा, रोहन हरपुडे व एक अनोळखी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुकानात असताना दुकानासमोर दुचाकी लावणाऱ्या मुलाला गाडी लावू नको असे सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीपैकी एका मुलाने फिर्यादी यांच्या डोक्यात हॉकी स्टिक मारून त्यांना जखमी केले. तसेच, इतरांनी त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांनी मारू नका, अशी विनंती केली तरी आरोपींनी ‘तु मेला तरी चालेल’ असे म्हणत मारहाण केली. तसेच, ‘तु परत येथे दिसला तर तुला परत मारू आणि तुझे दुकान फोडू’, अशी धमकी दिली व पळून गेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाय डी साळुंखे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.