Marunji: ‘शेजारच्या बाईशी का बोलते’ अशी विचारणा करत पत्नीवर काचेने वार;  पतीने स्वत:वरही केले वार

0

एमपीसी न्यूज – पत्नी शेजारच्या बाईशी बोलत असल्याच्या कारणावरून पतीने कपाटाच्या काचेने पत्नीवर वार करून तिच्या खूनाचा प्रयत्न केला. त्यानंतर पतीने स्वत:वरही काचेने वार करून घेतले. यात दोघेही जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि.22) मारूंजी येथे घडली. दोघा पती-पत्नीवर पिंपरीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

सुरेखा बाबाराव पिटलेवाड (वय 19, रा. शिंदे वस्ती, मारूंजी) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. तिचा पती बाबाराव सखराम पिटलेवाड (वय 29) असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी दुपारी आरोपी बाबाराव याने पत्नीला ’तु शेजारच्या बाईशी का बोलते, अशी विचारणा केली. यावरून झालेल्या वादात त्याने चिडून कपाटाच्या काचेने सुरेखावर वार केले.

छाती, पोट, कान, मांडी आणि पायावर ठिकठिकाणी वार केल्याने सुरेखा गंभीर जखमी झाली.

त्यानंतर बाबाराव याने स्वत:च्या डोक्यात आणि पोटात वार केले. यात तो जखमी झाला. दोघांवर पिंपरीतील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंजवडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक खाडे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like