Marunji : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल बाळगल्या प्रकरणी (Marunji) हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 28) सायंकाळी अनंतानगर, लक्ष्मी चौक मारुंजी येथे करण्यात आली.

Khed : चुकीच्या जमीन मोजणी विरोधात भौसे गावच्या शेतकऱ्यांची उप अधिक्षकांकडे धाव

गणेश पंढरी कांबळे (वय 23, रा. अनंतानगर, लक्ष्मी चौक, मारुंजी. मूळ रा. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. मारुंजी येथील लक्ष्मी चौकात एकजण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत गणेश कांबळे याला ताब्यात (Marunji) घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्टल आढळून आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.