Maruti Bhapkar : तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यकाळातील ‘हे’ चुकीचे निर्णय रद्द करा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या प्रशासकीय कार्यकाळातील संशयास्पद निर्णयांची चौकशी करावी. चुकीचे, महापालिकेचे नुकसान करणारे निर्णय रद्द करावेत. या प्रकरणातील दोषींवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर (Maruti Bhapkar) यांनी केली आहे.

याबाबत नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, नगरसेवंकांचा निर्धारीत पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला. 14 मार्च 2022 ते 17 मार्च 2022 या कालावधीत आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासक पदाची धुरा सांभाळताना खालील संशयास्पद निर्णय घेतले आहेत. स्थायी समितीत मनमानी पद्धतीने कोटयावधी रुपयांच्या कामांना प्रशासक म्हणून मंजुरी दिली. त्याचबरोबर काही धोरणात्मक निर्णय देखिल घेण्यात आले. हे सर्व निर्णय संशयास्पद असून या निर्णयांची चौकशी करुन या निर्णयांवर फेरविचार करावा.

Pune News : तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र शिक्षणातील उत्तमतेला चालना देणारे केंद्र बनावे – भगत सिंह कोश्यारी

त्यात यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई करण्याच्या 362 कोटी रुपयांच्या विषयाला मंजुरी देणे. नवीन महापालिका भवनाची 312 कोटी रुपयांची निविदा काढणे, स्मार्ट सिटी अमृत योजना, पाणीपुरवठा, आरोग्य, स्थापत्य, जल निस:रण, पर्यावरण आदी विभागात नेमलेल्या त्याच त्याच सल्लागारांना मुदतवाढ देणे. स्पर्श घोटाळा, कचरा डेपो आग प्रकरण, कुत्र्यांची नसबंदी, वैद्यकीय विभागामार्फत डॉक्टर/कर्मचारी/नर्सेस/सुरक्षारक्षक नेमण्याचा ठेका व त्यातील बनावट कागदपत्रे प्रकरण, वेगवेगळया दोषी अधिकाऱ्यांवरील चौकशी अहवालांची फेरतपासणी करुन हे अहवाल सार्वजनिक करणे. शिक्षण मंडळाच्या वतीने शालेय साहित्य वाटप प्रकरण, दक्षता व नियंत्रण विभागामार्फत झालेल्या चौकश्यांची चौकशी, शहरातील स्वच्छतेबाबत कोटयावधींचा खर्च करणे, जलतरण तलाव, नाटयगृहांचे खाजगीकरण करणे, स्मार्ट सिटीच्या कामांना मंजुरी देणे, अधिका-यांना पदोन्नती देणे, नोकर भरती प्रकरण, वाढीव खर्च, थेट पद्धतीची कामे या प्रकरणी आपण स्वत: जातीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी (Maruti Bhapkar) केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.