Pimpri News: मोची समाजाच्या प्रदेशाध्यपदी मारुती पंद्री यांची निवड

एमपीसी न्यूज – मोची मादिगा मादगी माधवी समाजाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यपदी मारुती पंद्री यांची निवड करण्यात आली. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात त्यांची एकमताने निवड झाली. समाजहिताचे काम करणार असल्याचे पंद्री यांनी त्यावेळी सांगितले.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पंद्री यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौरा केला. प्रदेशाध्यपदी नियुक्ती झाल्यानिमित्त सोलापूरमध्ये त्यांचा जाहीर सत्कार देखील करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे, माजी महापौर संजय हिंगड्डी, कार्याध्यक्ष बसवराज म्हेत्रे, नरसिंग आसदे, नागनाथ कासनोलकर, सिद्धार्थ भंडारे, व्यंकटेश भंडारे, राजकुमार आयगोळे, मच्छिंद्र लोगेकर, संजय मोतेकर, राजू निलगंट्टी, मोची समाजाचे उपाध्यक्ष हनुमंतू जंगम, सरचिटणीस अंबदास करबोळे, कुमार झगडेकर, दिरेश म्हेत्रे आदी उपस्थित होते.

समाजाचे बहुसंख्य लोक सोलापूर जिल्ह्यात आहेत. समाजातील लोकांना मी भेटत आहे. त्यांचे प्रश्न जाणून घेत, सर्वांना सोबत घेऊन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. समाजाचे प्रलंबित प्रश्न, मागण्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय संघटनेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे देखील पंद्री यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.