Alandi News : आळंदी मध्ये भक्ती शक्ती संघ आयोजित मासिक वद्य एकादशी भजन महोत्सव संपन्न

एमपीसी न्यूज : आळंदी येथील ज्ञानदर्शन धर्मशाळेत मासिक वद्य एकादशी भजन महोत्सवाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवात मध्ये अभिनव (Alandi News) गंधर्व पं.रघुनाथ खंडाळकर यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात पखवाजाची साथ धनंजय वसवे तर तबल्या ची साथ पांडुरंग पवार यांनी दिली.

 

तसेच या कार्यक्रमा मध्ये पिंपरी-चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचा यावेळी हार,शाल, श्रीफळ व सार्थ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या महोत्सवाचे आयोजन भक्ती शक्ती संघा तर्फे करण्यात आले होते.

 

Pune News : मरुमा फाउंडेशन आयोजित पहिला समर फेस्टिव्हल

 

यावेळी पं. कल्याणजी गायकवाड,पुरुषोत्तम महाराज पाटील, (Alandi News) आत्माराम महाराज शास्त्री, बाळासाहेब महाराज शेवाळे,संग्राम बापू भंडारे ,गावडे महाराज,पवार महाराज,रामदास ठोंबरे व विठ्ठल सुरवसे ,इ. अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.