Lonavala : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅली

एमपीसी न्यूज – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ आज लोणावळा शहरात नागरिकांनी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. मावळा पुतळा चौक ते शिवाजी महाराज चौक दरम्यान ही रॅली काढण्यात आली होती. वुई सपोर्ट सीएएच्या घोषणा देत नागरिकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दर्शविला.

हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसर यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व राजकिय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक, व्यापारी, विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रॅली दरम्यान 221 फूट लांबीचा तिरंगा ध्वज हातात घेत भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या. अतिशय शिस्तबद्धपणे रॅली काढत शिवाजी महाराज चौकात वंदे मातरम गिताने रॅलीचा समारोप झाला. यानंतर प्रमुख ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पोलीस अधिकार्‍यांना सीएए समर्थनाचे निवेदन देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.