Vadgaon Maval : संविधान दिनानिमित्त प्रस्ताविकेचे भाजपाच्यावतीने सामूहिक वाचन

एमपीसी न्युज – संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे वडगाव शहर भाजपा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक वाचन केले. मिलिंदनगर बुद्ध विहार या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला. संविधानाने घालून दिलेल्या नैतिक मूल्यांचे, जबाबदारीचे प्रत्येकाने पालन करावे, ती आपली जबाबदारी आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Constitution Day celebration: चिखलीतील घरकुल येथे संविधान दिन साजरा

यावेळी वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, वडगाव नगरपंचायतचे नगरसेवक प्रविण चव्हाण, माजी नगरसेवक ॲड विजय जाधव, नगरसेवक प्रसाद पिंगळे, वडगाव शहर भाजपा अनुसूचित जाती अध्यक्ष दीपक भालेराव,सरचिटणीस कल्पेश भोंडवे,मकरंद बवरे, वडगाव भाजपा युवा मोर्चा संघटक अनिकेत सोनवणे, उपाध्यक्ष संतोष भालेराव,विनय भालेराव,आशिष भालेराव, संदीप हिरभगत, विशाल जगताप,नारायण चव्हाण,सागर ओव्हाळ,हर्षल भालेराव,अजय भालेराव, प्रतीक भालेराव, जेष्ठ मार्गदर्शक चित्रकार प्रविण भालेराव, संतोष राऊत आदिसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच भाजपा सरचिटणीस कल्पेश भोंडवे, ॲड विजय जाधव, संतोष भालेराव, विनय भालेराव, भाजपा अनुसूचित जाती अध्यक्ष वडगाव शहर दीपक भालेराव यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पेश भोंडवे यांनी केले.तर आभार अनिकेत सोनवणे यांनी मानले आणि संपूर्ण संयोजन भाजपा वडगाव शहर यांच्या वतीने करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.