Pune : विमाननगर येथील आयटी हब इमारतीला भीषण आग

एमपीसी न्यूज :  पुण्यातील विमाननगर येथील (Pune) एका आयटी बिझनेस हबच्या इमारतीला दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही.

Pimpri : डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त जनजागृती

 

 

प्राथमिक अंदाजानुसार, बेसमेंटला असणारया इलेक्ट्रिक रुममधे आग लागून वर शेवटच्या नऊ मजल्यापर्यंत त्याचा धुर मोठ्या प्रमाणात पसरला गेला. (Pune) अग्निशमन दलाकडून 04 फायरगाडी 01 वॉटर टँकर 01 ब्रॉन्टो उंच शिडीचे वाहन दाखल झाले असून या आगीत अद्याप जखमी वा जिवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही. अंदाजे 2000 कर्मचारीवर्ग सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे. सध्या आग नियंत्रणात असून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.