Pimpri : विशाल वाकडकर सोशल फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय खुली कराटे स्पर्धेस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज –  माजी केंद्रिय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त शहरात विवीध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  विशाल वाकडकर सोशल फाऊंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नितीन काकडे यांच्या वतीने रविवार (दि. 9 डिसेंबर) वाकड येथील संत तुकाराम मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय खुली कराटे स्पर्धा यशस्विरीत्या पार पडली. 

यावेळी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  संजोग वाघेरे-पाटील तसेच नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक नाना काटे, शंकर मांडेकर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, शंकरराव वाकडकर, तानाजी हुलावळे, दिलीप हुलावळे, विशाल काळभोर, मयुर जाधव, हर्षवर्धन भोईर, कुणाल थोपटे, निलेश निकाळजे, विशाल पवार, विनायक काळभोर, भागवत जवळकर, अमोल पाटील, काशिनाथ तेलंगे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेला पिंपरी चिंचवड शहरासह राज्यभरातून स्पर्धक आले होते. यावेळी 700 ते 800 मुला-मुलींनी कराटे स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रथम चषक ड्रँगन मार्शल आर्ट (पुणे), द्वितीय चषक आँल कराटे चँम्पियन अकँडमी (नाशिक), तृतीय चषक डिफेन्स स्पोर्टस अकँडमी (पिंपरी चिंचवड) यांनी पटकाविले. यावेळी त्यांना ट्राँफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सहभागी सर्व खेळाडूं सोबतच मलेशिया येथे आयोजित कराटे स्पर्धेत सहभागी व विजयी होणा-या पिंपरी चिंचवडच्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी कराटे क्षेत्रातील मान्यवर व शहरातील नागरिक  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.