Pune News : खडकीत सापडलेल्या अमली पदार्थाचे धागे-दोरे हरियाणात, सूत्रधाराला अटक

एमपीसी न्यूज : अमली पदार्थविरोधी पथकाने ऑगस्ट महिन्यात खडकी बाजार परिसरातून तब्बल दहा लाख रुपये किमतीचे चरस जप्त केले होते. यावेळी पोलिसांनी एकाला अटक केली होती. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत या गुन्ह्याचे धागेदोरे हरयाणा राज्यात गेले. पुणे पोलिसांनी हरियाणा राज्यातून मुख्य सूत्रधार भरत शामसुंदर भोमिक (वय 37) याला अटक केली. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी खडकी बाजार परिसरात गस्त घालत असताना त्यांना विकास ईटकन हा इसम संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेल्या बॅगची तपासणी केली असता 10 लाख दहा हजार रुपये किमतीचे एक किलो चरस सापडले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत मुख्य सूत्रधार हरियाणात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांचे एक पथक आरोपीला पकडण्यासाठी हरियाणात रवाना झाले.

गुन्हे शाखेच्या पथकाने 19 ऑक्टोबर रोजी भोमीक याला हरियाणातून ताब्यात घेतले. पुण्यात आणून त्याला न्यायालयात हजर केले असता 25 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. पुण्यात जप्त केलेले चरस हिमाचल प्रदेशातून आरोपींनी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ते रेल्वेने पुण्यात आणण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.