Chinchwad : दुकानासमोरील पॅसेजचे कुलूप तोडून 52 हजारांचे साहित्य लंपास

Material worth Rs. 52,000 stolen from front passage of the shop by breaking the lock.

एमपीसी न्यूज – दुकानासमोर असलेल्या पॅसेजमध्ये कुलूप लाऊन ठेवलेले साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 13 ते 20 जुलै या कालावधीत चिंचवड मधील विशाल आर्केड शॉप नंबर चार येथे घडली.

विजय विश्वरूप ढवळे (वय 30, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढवळे यांचे चिंचवड येथे प्रिंटींग प्रेसचे दुकान आहे.

त्यांच्या दुकानासमोरील पॅसेजमध्ये कुलूप लाऊन काही साहित्य ठेवले आहे. तिथले साहित्य 13 ते 20 जुलै या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी पॅसेजचे कुलूप तोडून चोरून नेले.

त्यामध्ये वेल्डिंग मशीन, दोन ड्रील मशीन, हातोडा, पक्कड, पाने, नट, बोल्ट, टूल बॉक्सची बॅग असा एकूण 52 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.