Chinchwad News: सायन्स पार्कमधील एक लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील सायन्स पार्कचे लॉक तोडून चोरट्यांनी ड्रिल मशीन, स्कॅप फोल्डींग, टुल्स, ब्लुटुथ स्पिकर असे 1 लाख 14 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरूवारी सायंकाळी साते ते शुक्रवारी सकाळी नऊच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी सौमेन किशोर दास (वय-44, रा. आकुर्डी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड येथे महापालिकेचे सायन्स पार्क आहे. गुरूवारी सायंकाळी पार्क बंद केल्यानंतर चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला. पार्कमधील ड्रिल मशीन, स्कॅप फोल्डींग, टुल्स, ब्लुटुथ स्पिकर असे 1 लाख 14 हजार 200 रूपयांचे साहित्य चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.