Pune : पुणे महापालिकेचा स्त्युत्य उपक्रम ; पुण्यात फिरणार प्रसुती व्हॅन

एमपीसी न्यूूज – पुणे महापालिका आता सुसज्ज प्रसुती व्हॅन खरेदी करणार आहे. यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात तातडीने तरतूद करून लवकरच या व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत ही व्हॅन खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

पुणे शहर जरी राहणीमानाच्या दृष्टीने भारतात ‘एक नंबर’ असलं तरी येथील वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुणेकरांच्या नाकात दम आणून सोडते. अशात गरोदर महिलांना हॉस्पिटलमध्ये पोहोचणे म्हणजे मोठे जिकीरीचे काम त्यामुळेच गेल्या काही दिवसांत  हॉस्पिटलमध्ये पोहचण्यास उशीर झाल्याने रस्त्यात, रिक्षा, बस, गाडीमध्ये प्रसूती झाल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. त्यामुळेच पुणे महापालिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.