Maths Day: अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गणित प्रदर्शनास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पूर्व प्राथमिक विभागाच्या गणित प्रदर्शनास (Maths Day) पालकांनी हजेरी लावत आपला सहभाग नोंदवला. शाळेचे पटांगण पालकांच्या गर्दीने फुलून गेले होते.

22  डिसेंबर हा श्रीनिवासन रामानुजन यांचा जन्मदिन गणित दिवस (Maths Day) म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पूर्व प्राथमिक विभागाने गणित प्रदर्शनाचे आयोजन केले होते. शाळेच्या मैदानावर हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. पूर्व प्राथमिक विभागातील मुलांचा स्तर लक्षात घेऊन शाळेतील शिक्षिका नेहमीच कृतिशील उपक्रमातून प्रत्येक विषयातील संकल्पना मुलांना सहज  समजावून देत असतात. गणितासारख्या अवघड व कंटाळवाण्या विषयातील संकल्पना समजावून देताना तर शिक्षकांना तारेवरची कसरतच करावी लागते.

आनंदाने, सोप्या पद्धतीने, रोजच्या दैनंदिन व्यवहारातील गोष्टींमधून हसत खेळत मुलांना गणित हा विषय कसा शिकवला जातो, हे पालकांनाही समजावे म्हणून पालकांसाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

Maths Day : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात

या प्रदर्शनात गणितातील लहान लहान संकल्पना (Maths Day) समजावून देताना वेगवेगळ्या वस्तू , खेळणी, प्रतिकृती, प्रत्यक्ष अनुभव, खेळ या सर्वांचाच समावेश करण्यात आला होता. शिक्षिकांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. येणाऱ्या पालकांना प्रत्येक संकल्पना अगदी मुले समजूनच समजावून दिली जात होती. कृतीयुक्त आनंददायी शिक्षण काय असते आणि कसे घेतले जाते हे या गणित प्रदर्शनातून पालकांना दाखविण्यात आले. पालकांनी या प्रदर्शनास उदंड प्रतिसाद दिला आणि प्रदर्शनाचा आनंद लुटला.

शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. कविता अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, जिल्हा परिषदेचे शिक्षक विवेक वैराग हे उपस्थित होते. आपले अनुभव सांगत डॉ. किशोर यादव व विवेक वैराग यांनी पालकांशी संवाद साधला. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. कविता अय्यर व पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका शुभलक्ष्मी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागातील 30 शिक्षिकांनी या प्रदर्शनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वृषाली आढाव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.