Matrimony Fraud: मॅट्रीमोनियल साईटवरची ओळख दोन महिलांना पडली महागात

एमपीसी न्यूज : आजकाल बरेच जण मॅट्रीमोनियल साईटवरून ऑनलाईन आपला जीवनसाथी निवडत आहेत. मात्र या ऑनलाईच्या भानगडीत अनेकांना फसवणूकीला सामोरे जावे लागते. (Matrimony Fraud) वाकड पोलीस ठाणे व हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन महिलांनी दोन वेगवेगळ्या तक्रारी दिल्या आहेत, ज्यामध्ये एका महिलेची अशा साईटवरून आर्थिक फसवणूक झाली आहे तर एकीचे शारीरिक शोषण झाले आहे.

 

वाकड येथे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, मेट्रीमोनीयल साईटवर ओळख झालेल्या तरुणाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार 22 नोव्हेंबर 2021 ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत काळेवाडी, ताथवडे आणि जुनी सांगवी येथे घडला.शैलेश दीपक पवळे (वय 24, रा. कावेरीनगर, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने सोमवारी (दि.15) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपींची मेट्रीमोनीयल वेबसाईटवर ओळख झाली. फिर्यादी घटस्फोटीत असल्याचे माहिती असतानाही आरोपीने त्यांना लग्नाचे आमिष दाखवले.(Matrymony Fraud) आरोपीने फिर्यादी सोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यात फिर्यादी गरोदर राहिल्या. त्यानंतर आरोपीने त्यांना दोन दिवस गोळ्या खायला देऊन जबरदस्तीने गर्भपात केला. फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. वाकड पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Global english school: मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 

हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार,महिलेची मॅट्रीमोनीयल साईटवरून झालेल्या ओळखीतून सहा लाखांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार 14 जुलै ते 7 ऑगस्ट या एक महिन्याच्या कालावधीत घडला.याप्रकरणी एस.के.शर्मा व अभिषेक शर्मा (पूर्णनाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

पिडीत महिला व एस.के. शर्मा व अभिषेक शर्मा यांची मॅट्रीमोनीअल साईटवरून ओळख झाली. लग्न जमवण्याचे आमिष त्यांनी दाखवले.ओळख वाढवून त्यांनी फिर्यादी यांना आईच्या औषध उचारासाठी पैसे हवे आहेत म्हणत फिर्यादी यांच्याकडे वारंवार 6 लाख 20 हजार रुपये काढून घेतले. (Matrimony Fraud)फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

दोनही घटनामध्ये संबंधीत महिलांनी केवळ लग्नाच्या आमिषापोटी समोरील व्यक्तीची खातर जमा न करता विश्वास ठेवला असल्याने फसवणूक झाली. (Matrimony Fraud) त्यामुळे अशा ऑनलाईन साईटवर मैत्री करताना, लग्न जुळवताना योग्य ती सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.