मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी यशाची पहिली पायरी

एमपीसी न्यूज – दहा वर्षाची यशाची परंपरा, महाराष्ट्रातील सर्वोत्तम (Matrix Science Academy) ट्रेनर्स आणि 12 हजारापेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थी घडवणारी ‘मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी’ ही डॉक्टर, इंजिनीयर होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यशाकडे घेऊन जाणारी पहिली पायरीच म्हणावी लागेल. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचे काम अकॅडमी मागील दहा वर्षापासून करत आहे.

एमएचटी-सीईटीमध्ये ही 100 टक्के गुण मिळवू शकतात. हे 2021 च्या बॅचमध्ये अकॅडमीने दाखवून दिले आहे. अकॅडमीच्या शुभम बेनके याने सीईटीमध्ये 100 टक्के गुण प्राप्त करून महाराष्ट्रातून पहिला आला होता. अकॅडमीच्या 2022 च्या बॅचमध्ये 32 विद्यार्थ्यांनी 99.50 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले होते. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीचे संस्थापक हे निशांत पटवर्धन असून व्यवस्थापक मंडळ म्हणून अलगेश पत्रिके, रविंद्र यादव हे काम पहातात.

मॅट्रिक्स अकॅडमी ही 2013 साली अवघ्या 35 विद्यार्थ्यांपासून सुरु झाली होती. त्या अकॅडमीत 2021 या साली अडीच हजारापेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेत होते. अकॅडमीमध्ये अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची आयआयटी-जेईई, एमएचटी-सीईटी, एनईईटी या परिक्षांची कसून तयारी करवून घेतली जाते. प्रत्येक विषयासाठी उत्तम प्रशिक्षक, विद्यार्थ्यांशी सुसंवाद,अभ्यासासाठी योग्य वातावरण, सुनियोजीत अभ्यास, Integrated Batch (HSC+JEE/NEET/CET+English+Geography+IT) तसेच Regular Btch (HSC+JEE/NEEt?CET), Subject-wise (PCBM/ IT) या बरोबरच ऑनलाईन बॅचेस (HSC board +JEE/NEET, CET),Impulse Batch (HSC Board JEE/NEET/CET) केवळ अकरावी बारावी नाही, तर या बरोबरच 8 वी, 9वी, 10 वीच्या फाऊंडेशन बॅचेस देखील मॅट्रीक्स सायन्स अकॅडमीमध्ये घेतल्या जातात.

अकॅडमीमध्ये केवळ अभ्यास-अभ्यास न करता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा ही विचार केला जातो. म्हणूनच अभ्यासाबरोबर सहल, ट्रेकींग देखील आयोजित केली जाते. जेणेकरून मुलांच्या मनावरील भार हलका होतो. मॅट्रिक्स अकॅडमीचे पिंपरी-चिंचवड शहरात प्राधिकरण, चिंचवड, शाहूनगर, पिंपरी, रावेत, निगडी या सहा ठिकाणी क्लास सध्या सुरु आहेत. या विषयी बोलताना निशांत पटवर्धन म्हणाले की, खूप स्वप्न घेऊनही अकॅडमीची सुरुवात केली आहे. ज्यामध्ये केवळ विद्यार्थी नाही, तर आम्ही इजिनीअरींग व मेडीकल सायन्सच्या मार्गावर दिशा (Matrix Science Academy) दाखवणारे दिशादर्शक व मशालवाहक बनवत आहोत.

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

जेणेकरून ते पुढील पिढीला दिशा दाखवू शकतील. सर्वांच्या सहकार्याने आम्ही यश संपादन करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये विद्यार्थ्यांचा ही मोठा वाटा आहे. मागील नऊ वर्षात आम्ही पालकांचा विश्वास जिंकला आहे. कारण आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर त्यांच्यामध्ये सायन्स, टेक्नॉलॉजीसाठी पॅशन तयार करतो. त्यांचे ते पॅशन जोपासतो त्याला योग्य दिशा देतो. त्याचा केवळ स्पर्धा परिक्षा नाही तर त्यांच्या पुढील भविष्यासाठीही फायदा होतो. अर्थात, हे सार काही आम्ही एकटे करु शकत नाही. त्याला विद्यार्थी व त्यांच्या पालकांची साथ लागते, जी गेली नऊ वर्ष आम्हाला लाभत आहे.

कारण यश गोड आहे, पण त्याच गुपीत हे दोन वर्षांचा घाम आहे. याच सुत्रामुळे 2013 पासून सुरु केलेल्या अकॅडमीच्या नऊ वर्षात शहरात सहा ब्रांच आम्ही तयार करू शकलो. असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. तर, अकॅडमीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तेजस कुलकर्णी याचे पालक म्हणाले की, तेजस याचा अकॅडमी जॉईन केल्यानंतर अभ्यासाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. मुळात त्याच्या संकल्पना विकसीत झाल्याने कोणताही ताण न घेता, तो मोकळेपणाने अभ्यास करत आहे. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीमध्ये त्याला पाठवणे, हा आमचा निर्णय अगदी सार्थ ठरला आहे.

अकॅडमीचा आत्तापर्यंतचा आलेख पहायचा झाला, तर 2013 ते 2021 या कालावधीत 230 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षामध्ये 99 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. 750पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तसेच, 45 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना IIT, NIT, COEP, BIT सारख्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. अडीच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना देशभरातील टॉपच्या मेडीकल व इंजीनिअरींगच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. मग, विचार कसला करताय?

आत्ताच तुमच्या मुलाचे नाव मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीत नोंदवा व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी निश्चित होऊन जा.

अधिक माहितीसाठी संपर्क पत्ता – 1) मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी, अपोजीट CMS, सेक्टर नं. 28, संभाजी चौक, प्राधिकरण – 411044

संपर्क क्रमांक –  निगडी, प्राधिकरण  क्लाससाठी संपर्क क्रमांक 8484879514, 8484865914

रावेत क्लास – +91 84848 07149

चिंचवड, पिंपरी, शाहूनगर क्लास – +91 93732 69468

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.