BNR-HDR-TOP-Mobile

talegaon dabhade : न्यु मावळ अॅग्रो टुरिझम संस्थेच्या अध्यक्षपदी माऊली दाभाडे

INA_BLW_TITLE

एमपीसी न्युज- न्यु मावळ अॅग्रो टुरिझम संस्थेच्या अध्यक्षपदी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे यांची तर उपाध्यक्षपदी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ टिळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, असिफ शेख, ऍड . खंडुजी तिकोणे, संभाजी शिंदे, रवी ठाकर, शाम कडु, रवी पोटफोडे, बाबुराव येवले आदी संचालक उपस्थित होते. सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहिले.

निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष माऊली दाभाडे म्हणाले की, मावळ तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून मोठा रोजगार सर्वसामान्यांना उपलब्ध करून देणार. तसेच ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे याठिकाणी पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

HB_POST_END_FTR-A4

.