Alandi : माउलींच्या पालखी सोहळ्याचे २५ जूनला प्रस्थान

एमपीसी न्यूज –  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातील विनामंडपातून २५ जूनला सायंकाळी ४ वाजता पंढरपूरला आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. या वर्षी पुणे येथे दोन, तर सासवड येथे दोन मुक्काम असणार आहेत. १२ जुलैला आषाढी एकादशीनंतर सहा दिवस पंढरपूरमध्येच पालखीचा मुक्काम राहणार आहे. १७ जुलैला आळंदीकडे परतीचा प्रवास सुरू होईल. 

पालखी कार्यक्रम पुढीलप्रमाणे –  दि. २५ जूनला पालखीचे प्रस्थान झाल्यावर आजोळ घरी पाहिला मुक्काम होईल. दि. २६ व २७ जूनला पुणे येथे स्वागत व पाहूणचार होईल. २८ जूनला सासवडकडे प्रस्थान होईल.

या वर्षी एकादशीला पुण्यातून न निघता दशमीला पालखी सासवडकडे निघणार आहे. दि. २८ व २९ ला सासवड येथे दोन मुक्काम असणार आहेत. ३० जून – जेजूरी मुक्काम,  १ जुलै – वाल्हे मुक्काम, २ जुलै – सकाळी नीरा येथे पादुकांचे नीरा स्नान होईल.

यानंतर सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. लोणंद येथे उभे रिंगण व मुक्काम, ३ जुलै – तरडगाव मुक्काम, ४ जुलै – फलटण मुक्काम, ५ जुलै – बरड येथे पाहिले गोल रिंगण व मुक्काम, ६ जुलै – नातेपुते मुक्काम, ७ जुलै – माळशिरस येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम होईल. ८ जुलै – वेळापूर येथे तिसरे गोल रिंगण व मुक्काम, ९ जुलै – भंडीशेगाव मुक्काम होईल.

१० जुलैला सकाळी वाखरी प्रवासात भंडीशेगाव येथेच दुसरे उभे रिंगण व चौथे गोल रिंगण होईल. यानंतर वाखरी येथे मुक्काम. ११ जुलैला विसबावी येथे तिसरे उभे रिंगण होईल. त्यानंतर पालखीचे पंढरपुरात आगमण होईल. १२ जुलै एकादशीला नगर प्रदक्षिणा व श्रींच्या पादुकांचे चंद्रभागा स्नान होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.