Maval : अनाथ आश्रमात आयोजित मोफत आरोग्य शिबिरात 104 जणांची तपासणी

एमपीसी न्यूज -शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणेचे जिल्हा समन्वयक भूषण जगताप आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आढले बुद्रुक (ता. मावळ) यांच्या संयुक्त विद्यमाने अनाथ आश्रमातील शालेय मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले. यावेळी 104 जणांची तपासणी करण्यात आली.

शांताई येवले अनाथ मुलींचे आश्रम पाचाणे व ऐम फॉर सेवा आश्रम शिवणे येथील अनुक्रमे पटसंख्या 31 मुली व 52 मुले असणारे अनाथ आश्रम आहेत. तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या भूषण जगताप यांना समजल्या त्यांनी लगेच शिबिराचे आयोजन करून शिबिर राबविले.

सर्व विद्यार्थी व संबंधित कर्मचाऱ्यांचे रक्तगट व CBC तपासणी करून वैद्यकीय अधिकरी डॉ. श्री. दिलीप सूर्यवंशी व डॉ. सौ. संजीवनी सूर्यवंशी यांनी तपासणी केली. तसेच आवश्यक त्यांना औषधं देऊन काळजी घेण्याविषयी सल्ला दिला. यावेळी 104 जणांची तपासणी करण्यात आली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या जनहिताच्या, दुर्बल घटकांविषयी असणाऱ्या भूमिकेचे भान ठेवून, राज्याचे आरोग्यमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र आढले बुद्रुक (ता. मावळ) यांच्या सहकार्याने घेण्यात आले, असे जगताप यांनी सांगितले.

कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी शिबिर पार पाडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या शिबिरप्रसंगी जिल्हा समन्वयक भूषण जगताप, मुख्याध्यापक राजेंद्र देशमुख, युवराज सूतार, राहुल घारे, संदीप घारे, अमोल पिंगळे, निलेश जगताप, सुभाष शेळके आदी मान्यवर व आरोग्यसेवक रघुनाथ भांडेकर, प्रकाश भालेकर, अमित बागडे, अनिकेत पारठे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.