Maval : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणाऱ्या 12 जणांवर शिरगाव पोलिसांकडून गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर फिरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या 12 जणांवर शिरगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

मयूर अर्जुन भोते (वय 25, रा. भोतेवस्ती, परंदवडी, ता. मावळ), सागर बुवासाहेब भोते (वय 33, रा. परंदवडी, ता. मावळ), बापू किसन सानप (वय 20), भीमराज तायप्पा गायकवाड (वय 26, रा. धामणे, ता. मावळ), कुणाल राजू कदम (वय 20), ओंकार रतन शिंदे (वय 20, रा. ठाकरवस्ती, परंदवडी, ता. मावळ), निखिल बाळासाहेब मुळीक (वय 19), ओंकार साहेबराव घारे (वय 21), शुभम विजय घारे (वय 21), जोधित्य दीपक घारे (वय 19, रा बेबडओव्हळ, ता. मावळ), संतोष पुंडलिक बेदरकर (वय 44), शिवाजी गोविंद काळोखे (वय 68, रा. साने आळी, शुक्रवार पेठ, तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी आणि जमावबंदीचे देखील आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरण्यावर यामुळे निर्बंध आले आहेत. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यासह राज्यभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरीही नागरिक आदेशाची पायमल्ली करून जाणीवपूर्वक घराबाहेर येत आहेत. पोलिसांकडून देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.

भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270, 271, 290, महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 नियम 11 व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 57 (ब) ब नुसार गुन्ह्यांची नोंद केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.