Maval : लोकसभा मतदारसंघातील 208 मतदान केंद्रांवर ‘वेब’ची नजर !

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार 504 मतदान केंद्रे असून त्यापैकी 208 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. वेब कॅमे-याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये पनवेलमध्ये सर्वाधिक 58 मतदान केंद्रांचा समावेश आहे. सर्वांत कमी नऊ मतदारसंघ चिंचवड मधील आहेत. या कॅमे-याच्या माध्यमातून करण्यात येणारे चित्रीकरण जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या कार्यालयात दिसणार आहे.

मतदारसंघात एकूण दोन हजार 504 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी 208 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. पनवेलमध्ये सर्वाधिक 58 मतदान केंद्रांचा समावेश आहे. सर्वांत कमी नऊ मतदारसंघ चिंचवड मधील आहेत. या कॅमे-याच्या माध्यमातून करण्यात येणारे चित्रीकरण जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या कार्यालयात दिसणार आहे. पनवेललमधील 58, कर्जत 35, उरण 29, चिंचवड 9 आणि पिंपरी 40 अशा एकूण 208 मतदारसंघाचे कॅमे-याद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे.

वेब कॅमेरे असणारी केंद्रे!
पनवेल – 58
कर्जत – 35
उरण -29
चिंचवड – 9
पिंपरी – 40
एकूण – 208

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.