Maval : जमीन विक्रीच्या व्यवहारात 24 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – जमीन विक्रीच्या व्यवहारात (Maval) एका ज्येष्ठ नागरिकाची 24 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 16 सप्टेंबर 2016 ते 31 मार्च 2023 या कालावधीत सांगवडे गावात घडला.

शाबू दगडू जगताप (रा. सांगवडे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी जयद्रथ आत्माराम आखाडे (वय 65, रा. त्रिवेणीनगर) यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप यांनी फिर्यादी आखाडे यांच्यासोबत सांगवडे गावातील 24.25 गुंठे जमीनीचा व्यवहार 31 लाख रुपयांना केला. त्या पोटी जगताप यांनी फिर्यादी यांच्याकडून रोख आणि धनादेशाद्वारे 24 लाख रुपये रक्कम घेतली.

Pune : संजय राऊत यांना झेड प्लस सुरक्षा द्या – सुप्रिया सुळे

ती जमीन नवीन शर्ट (सत्ता प्रकार) असल्याने तो शेरा (Maval) काढण्यासाठी पत्रव्यवहार सुरू असताना जगताप यांनी ती जमीन फिर्यादी यांच्या परस्पर मधुकर रतिकांत जगताप यांना विना मोबदला हक्क सोड करून विकली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव परंदवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.