Maval: छाननीत 28 उमेदवारांचे अर्ज पात्र; चार जणांचे अर्ज बाद

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या 32 उमेदवारांपैकी आज (बुधवारी) झालेल्या छाननीमध्ये 28 उमेदवार पात्र ठरले. तर, चार जणांचे अर्ज बाद झाले आहेत. शुक्रवारी (दि.12) उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत आहे. त्यानंतर मावळातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 
महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होत आहे. शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास  2 एप्रिलपासून सुरुवात झाली होती. 6 एप्रिलपर्यंत केवळ 7 उमेदवाराचे अर्ज दाखल झाले होते. काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह 17 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एकूण 32 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
  • प्राप्त अर्जांची छाननी आज (बुधवारी)झाली. छाननीत  32 उमेदवारांपैकी 28 उमेदवार पात्र ठरले. तर, चार जणांचे अर्ज बाद झाले आहेत. शुक्रवारी (दि.12) उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत आहे. माघारीनंतर मावळातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

‘हे’ आहेत पात्र उमेदवार 

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडीचे पार्थ पवार, शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे, बहुजन समाज पार्टीचे संजय किसन कानडे, बळीराजा पार्टीचे गुणाट संभाजी नामदेव, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे जगदीश शामराव सोनवणे, आंबेडकर राईट्‌स पार्टी ऑफ इंडियाच्या जया संजय पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे पंढरीनाथ नामदेव पाटील, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भिवाजी महाडिक, हिंन्दुस्थान जनता पार्टीचे भीमराव आण्णा कडाळे, भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचे मदन शिवाजी पाटील, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम नारायण पाटील, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे सुनील बबन गायकवाड
  • त्याचबरोबर अपक्ष अजय हनुमंत  लोंढे, अमृता अभिजीत आपटे, जाफर खुर्शिद चौधरी, धर्मपाल यशवंतराव तंतरपाळे, नवनाथ विश्वनाथ दुधाळ,  नुरजहॉ यासिन शेख, प्रकाश नैनूमल लखवाणी, प्रशांत गणपत देशमुख, बाळकृष्ण धनाजी घरत, मिलिंदराजे दिगंबर भोसले, राकेश प्रभाकर चव्हाण, राजेंद्र मारुती काटे, विजय हनुंमत रंदिल, सूरज अशोकराव खंडारे, सुरेश श्रीपती तौर, डॉ. सोमनाथ अर्जुन पौळ या 28 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
यांचे अर्ज झाले बाद 
अपक्ष प्रकाश गणपत देशमुख, सुभाष गोपाळ बोधे, घोडके श्याम आणि शिवाजी तानाजी धोंडे यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.