Maval : ठाकर समाजातील 90 जणांना घरपोच मिळाले जात प्रमाणपत्र

एमपीसी न्यूज – उर्से आणि परंदवडी गावातील ठाकर समाजातील नव्वद नागरिकांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. शासकीय कार्यालयांच्या चकरा न मारता घरपोच जात प्रमाणपत्र मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. हे अभियान आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून राबवले जात असल्याने नागरिकांनी शेळके यांचे आभार मानले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर ठाकूर,सतीश कारके,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर शिंदे,पोलीस पाटील गुलाब आंबेकर, गबाजी धामणकर,सुधीर बराटे,निलेश थोरात,मुख्याध्यापिका निर्मला काळे,बाळासाहेब घारे,आमदार सुनिल शेळके जनसंपर्क कार्यालयाचे सचिन वामन,नबीलाल आत्तार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Sharad Pawar : वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघात शरद पवार यांची सभा; कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून उर्से आणि परंदवडी गावातील ठाकर समाजातील नव्वद नागरिकांना जात प्रमाणपत्राचे वाटप जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले.

ठाकर समाज प्रामुख्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर राहत असल्याने त्यांना शासकीय कार्यालयात जाऊन जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही.शासकीय कार्यालयात वारंवार हेलपाटे मारुनही जात प्रमाणपत्र काढण्यासाठीचे संपुर्ण मार्गदर्शन न मिळाल्याने नाउमेद झालेल्या नव्वद ठाकर बांधवांना घरपोच जात प्रमाणपत्र मिळाल्याने नागरिकांनी आमदार शेळके यांचे आभार मानले.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत विविध शासकीय योजना कार्यान्वित आहेत.परंतु या कुटुंबांकडे जात प्रमाणपत्र नसल्याने त्यांना योजनांचा लाभ घेता येत नाही.ठाकर बांधवांना आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र लवकर मिळावे यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी मागील चार वर्षांपासून स्वतंत्र यंत्रणा राबविली.व ‘आदिम सेवा अभियानाची’ प्रभावी .अंमलबजावणी करीत प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन नागरिकांच्या कागदपत्रांचे संकलन करत अर्ज भरुन घेतले.त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावात जाऊन जात प्रमाणपत्राचे मोफत वाटप करण्यात येत आहे.

 “आमदारसाहेबांनी आदिम सेवा अभियान राबविल्यामुळे जातीचा दाखला काढण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास कमी झाला.या दाखल्यांमुळे शैक्षणिक व शासकीय योजनांचा लाभ मिळवणे सोपे होईल.असे उपक्रम समाजातील वंचित घटकांसाठी नक्कीच वरदान ठरतील.”

– सरपंच भारती गावडे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.