Maval : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्याने पळवली; चोरटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना आज (सोमवारी) पहाटे दीडच्या सुमारास केशवनगर, वडगाव मावळ येथे घडली.

मनोज पानसरे (रा. सांगवी रोड, वडगाव मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मनोज पानसरे यांची स्प्लेंडर दुचाकी (एम एच 14 / बी ई 9199) रविवारी रात्री त्यांच्या राहत्या घरासमोर पार्क केली होती. सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराभोवती घिरट्या घातल्या. त्यानंतर त्याने घराच्या समोर पार्क केलेली दुचाकी चालू न करता रस्त्यावर आणली आणि त्यानंतर चोरटा दुचाकी घेऊन पसार झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.

मनोज पानसरे यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1