Maval : कोरोनामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पेरणीपूर्व तपासणी प्रात्यक्षिक उपक्रम

Maval: A direct pre-sowing inspection demonstration activity on farmers' farm amid Corona

तळेगाव दाभाडे – नानोली तर्फे चाकण येथे कृषी विभागाकडून पेरणीपूर्व बियाणे उगवण तपासणी प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्वतयारी म्हणून कोरोनामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पेरणीपूर्व तपासणी प्रात्यक्षिक उपक्रम राबविण्यात आला.

लॉकडाऊन काळात गावात बैठका घेता येत नसल्यामुळे यंदाच्या खरीप पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असणारे सोयाबीन बियाणे खात्री करून घेण्यासाठी पुढील पद्धतींचा वापर करण्यास सांगण्यात आले.

पद्धत 1 – गोणपाटाचे  चौकोनी तुकडे करून तीन नमुने तयार करावे. ते ओले करून त्यावर 100 दाणे मोजून ते दीड ते दोन सें.मी. अंतरावर 10-10 च्या रांगेत ठेवावे असे 3 नमुने तयार करावे व पाणी मारून वरून गोणपाट झाकून गोल गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे व अधून मधून पाणी मारावं व 6-7 दिवसानंतर कोंब आलेले दाणे वेगळे करून 100 पैकी 70 दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर ते बाजारातील गुणवत्तेचे आहे असे समजा व शिफारशीनुसार पेरणीसाठी वापरा पेरणी करतांना बियाण्याला थायरमकार्बनडॅझीम किंवा ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकांची तसेच रायझोबियम,पीएसबी या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करा.

पद्धत 2 – 100-100 दाण्याचे 3 संच तयार करून काचेच्या 3 ग्लासात पाणी घेऊन त्यात हे 100 दाणे टाका. 5-7 मिनिटानंतर दाणे वेगळे काढा व त्यामधील पूर्णत फुगलेले व बियाणाच्या टरफलावर सुरकुत्या पडलेले बियाणे वेगळे करा व मोजून घ्या. फुगलेले बियाणे टरफलात पाणी गेल्यामुळे पेरणीसाठी अयोग्य आहे व सुरकुत्या पडलेले पेरणीयोग्य आहेत असे समजावे. अशा प्रकारचे प्रात्यक्षिक सहाय्यक कृषी अधिकारी प्रियंका पाटील यांनी अनिता गायकवाड यांच्या शेतात करून दाखवले.

 “बाजारात नका मारू येरझारा, उगवण तपासणी करा अन् घरचेच सोयाबीन पेरा,” असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

मंडळ कृषी अधिकारी व्ही. व्ही. कुलकर्णी व कृषी पर्यवेक्षक डी.डी.तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनीआवाहन केले आहे की, उत्पादनवाढीसाठी पेरणी करताना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्राचा वापर करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.