Maval : मृत घोडा पुरण्यावरून दोन गटात मारामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – मृत घोडा पुरण्यावरून (Maval) दोन गटात हाणामारी झाली. ही घटना मावळ तालुक्यातील धामणे गावात गुरुवारी (दि. 15) रात्री घडली. या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हनुमंत मारुती गराडे (वय 60, रा. धामणे, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शरद प्रकार गराडे (रा. धामणे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची गोशाळा असून त्यात असलेला एक घोडा मृत झाला. त्याला पुरण्यासाठी हनुमंत गराडे गायरानातील जमिनीत जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करत होते. त्यावेळी आरोपीने घोडा पुरण्यासाठी अडवले. हनुमंत यांनी जाब विचारला असता आरोपीने लोखंडी गजाने डोक्यात मारून हनुमंत यांना जखमी केले.

PCMC : अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहीम

या विरोधात शरद प्रकाश गराडे (वय 41) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार हनुमंत गराडे, रुपेश गराडे, मंगेश गराडे (सर्व रा. धामणे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा (Maval) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमुनंत गराडे यांचा मृत घोडा शरद गराडे यांच्या वडिलोपार्जित शेतात पुरत असल्याचे शरद यांचे म्हणणे आहे. शेतात जेसीबीने खड्डा खोदत असताना शरद यांनी जेसीबी चालकाला जाब विचारला असता त्याने अन्य आरोपींना बोलावून घेत शरद यांना मारहाण केली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास शिरगाव परंदवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.