Maval : आंदर मावळच्या विकासासाठी 24 कोटी 44 रुपयांचा निधी मंजूर – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कान्हेफाटा ते टाकवे रस्त्यावर अत्यंत महत्वाच्या इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कामासाठी रु. 9 कोटी निधी मिळाला असून यामुळे आंदर मावळ भागाचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे जून 2019 मध्ये संपन्न होत असलेल्या अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मावळ मतदारसंघातील खालील कामांसाठी 24 कोटी 44 लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. आगामी काळात मावळ तालुक्याला विकासाचे मॉडेल करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

बाळा भेगडे यांना राज्यमंत्रिपद मिळाल्यामुळे पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मावळला झुकते माप देण्यात आले आहे. एकूण 11 कामे मंजूर झाली असून त्यामध्ये प्रामुख्याने १) कुरवंडे खंडाळा रस्ता प्रजिमा १४६ किमी.०/०० ते ३/०० व ६/५०० ते १५/२०० ची सुधारणा करणे. रु.१००.०० लक्ष, २) सडवली शिवणे डोणे रस्ता कि.मी.०/१०० मधील मोठ्या पुलाच्या जोडरस्त्यासाठी भूसंपादन करणे.१००.०० लक्ष, 3) कान्हेफाटा टाकवे वडेश्वर कुसूर खांडी सावळा रस्ता प्रजिमा २२ कि.मी.१०/०० ते २०/०० ची सुधारणा करणे. ४००.०० लक्ष, ४) एकविरा देवी पायथा ते कार्ला भाजे लोहगड ते प्रजिमा २७, प्रजिमा २५ रस्ता कि.मी.४/५०० ते ६/७०० ते ८/२०० ची सुधारणा करणे. रु.२००.०० लक्ष,

५) मुंबई-पुणे-बैगलोर रस्त्याची वडगाव, कामशेत, वलवन अंतर्गत लांबी रा.मा.१२६ कि.मी.०/२०० ते १/८०० ची सुधारणा करणे. ६०.०० लक्ष ६) कान्हेफाटा टाकवे वडेश्वर रस्ता प्रजिमा २२ कि.मी.3/४०० मध्ये पुलाची पुनर्बांधणी करणे. ९००.०० लक्ष, ७) कामशेत नाणे गोवित्री जांभवली कोंडेश्वर मंदिर रस्ता प्रजिमा ७८ कि.मी.१८/६०० ते २२/०० ची सुधारणा करणे. रु.१३५.०० लक्ष, ८) प्रजिमा २६ ते औढे देवले मळवली पाटण पाथरगाव ते रा.मा.4 ला मिळणारा रस्ता प्रजिमा १०७ कि.मी.०/०० ते १३/२०० ची सुधारणा करणे.८१.०० लक्ष,

९) सांगवडे दारूंब्रे रस्ता प्रजिमा १०५ कि.मी.०/०० ते 3/२००, ९/०० ते १२/०० व २२/६०० ते २४/०० ची सुधारणा करणे. १२८.०० लक्ष, १०) सोमाटणे शिवणे कडधे रस्ता प्रजिमा २८ कि.मी.९/५०० ते १०/५०० व १५/६०० ते १८/६०० ची सुधारणा करणे.१६०.०० लक्ष, ११) रा.मा.५५ ते इंदोरी जांभवडे जाधववाडी रस्ता करणे. प्रजिमा १०३ कि.मी.९/०० ते १५/०० ची सुधारणा करणे. रु. १८०.०० लक्ष असा एकूण २४ कोटी ४४ लक्ष रुपये निधी खालील कामासाठी मंजूर झालेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.