Maval: चर्मकार समाजातील गरजूंना घरपोच मदतीचा हात

एमपीसी न्यूज –  मागील एक महिन्यापासून देशात लॉकडाऊन असल्याने  गोरगरीब लोकांच्या जवळील उदरनिर्वाहासाठीचे पैसे देखील संपले. त्यातच घराबाहेर हि पडता येत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील चर्मकार समाजातील गरजुंना मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तुच्या कीटचे वाटप श्री संत रोहीदास समाज सेवा संघ मावळ यांच्या वतीने तालुक्यातील १२५ गरजुंना घरपोच वाटप करण्यात आले.

चर्मकार समाजातील दानशूर व्यक्तीनी ‘माझा समाज, माझे कर्तव्य’ हा संदेश देत विविध प्रकारची मदत जमा करुन आपल्या समाजातील कुठलाही गरजु अन्नधान्या शिवाय वंचित राहु नये. कोरोना महामारीच्या संकटात तो अडचणी येऊ नये या करीता मदतीचा संकल्प केला आहे.

 गरजूंना मदत मिळावी यासाठी चर्मकार समाजातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.