Maval : कृषि पदवीधर संघटना मावळ तालुका, विद्यार्थी अध्यक्षपदी विनीत गावडे

कृषि पदवीधर संघटना ही राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर आणि शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी 2012 साली कृषिभूषण महेश कडूस पाटील यांनी स्थापन केली आहे.

एमपीसी न्यूज – विनीत दिनेश गावडे यांची नुकतीच राज्य कृषि पदवीधर संघटनेच्या मावळ तालुका विद्यार्थी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर सौरभ नामदेवराव ढोरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

युवक प्रदेशाध्यक्ष सुरज खोमणे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुमित धामणे पाटील, कार्याध्यक्ष मयुर महाजन, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी उपाध्यक्ष मनीष भदाणे पाटील,  पुणे जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष  गणेश कायगुडे पाटील, मावळ तालुका युवक अध्यक्ष अनुप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.

संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना संघटीत करण्यासाठी दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपाध्यक्ष सौरभ नामदेवराव  ढोरे,  सचिव राहूल खेडकर, कार्याध्यक्ष सोहम भूसे, संघटक ऋत्विक जाधव अणि सल्लागार साहिल ढेरंगे यांनी सांगितले.

कृषि पदवीधर संघटना ही राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर आणि शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी 2012 साली कृषिभूषण महेश कडूस पाटील यांनी स्थापन केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.