Maval : मावळ चषक कुस्ती स्पर्धेत अजित करवंदे, सावरी सातकर यांनी मिळवल्या मानाच्या गदा

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या (Maval) मान्यतेने व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने मावळ चषक कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. पुरुष गटात कल्हाट गावच्या अजित करवंदे यांनी ऊर्से गावच्या संकेत ठाकूर याला हरवत मानाची गदा पटकावली. तर महिला गटात सावरी सातकर हिने सनम शेख हिच्यावर मात करुन मानाची गदा पटकावली.

 

यावेळी विजेत्यांना चांदीची गदा व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. शनिवार (दि.27) सोमाटणे येथील मैदानावर झालेल्या स्पर्धेत मावळ तालुक्यातील 240 मल्लांनी व 25 महिला मल्लांनी सहभाग नोंदविला.बाल गट, कुमार गट व वरिष्ठ गट अशा 250 प्रेक्षणीय कुस्त्या यावेळी झाल्या.स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असलेली लढत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरूद्ध उप महाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

 

Vadgaon : मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक

 

स्पर्धेचे आयोजन आमदार सुनिल शेळके, दिपक हुलावळे, संदीप आंद्रे, किशोर सातकर, देवा गायकवाड इ.केले होते.

 

स्पर्धेचे उद्घाटन ऑलिंपिकवीर मारुती आडकर, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खंडू वाळुंज,संभाजी राक्षे,सचिन घोटकुले, मनोज येवले,तानाजी कारके,अंकुश काकरे, बंडू येवले,पप्पू कालेकर तसेच मावळमधील पैलवानांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचे सूत्रसंचालन बाबा निम्हण, संदीप वांजळे, चंद्रकांत चांदेकर अजिंक्य टिळे यांनी (Maval) केले.

गटनिहाय विजेते,उपविजेते पुढीलप्रमाणे :
बाल गट- 22 किलो चेतन चिमटे, पवन दळवी.
25  किलो श्रवण बोडके,आरुष ठुले.
28 कि.ओम पवार,अनुज डुकरे.
32 कि.स्वराज बोडके, तुषार शिंदे.
35 कि.राजवर्धन घारे,मोहित दाभाडे.
38  कि.वेदांत भोईर,मयूर सुपे.

42  कि.संकल्प चांदेकर,चैतन्य ठाकर.
कुमार गट-
45 किलो कार्तिक आडकर,शौर्य गोपाळे.
48 कि.साहिल दगडे,महेश खमसे.
51 कि.मयूर आखाडे,धीरज शिंदे.
55 कि.तेजस कारके,ओम वाघोले.
60 कि.साहिल आंद्रे,कौशल्य घोटकुले.
वरिष्ट गट-57 कि.सतीश मालपोटे, स्वप्निल काटे.
61 कि.अभिषेक हिंगे, सागर जांभुळकर.
65कि.वैष्णव आडकर, प्रतीक येवले.
70 कि.समीर घारे,सुजल वाळुंज.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.