Maval: मद्यपी मुलाकडून वडिलांना बेदम मारहाण

Maval: alcoholic son beaten Father आरोपीने लहान भावाला देखील हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.

एमपीसी न्यूज- दारू पिऊन आलेल्या मुलाने वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.21) रात्री मावळ तालुक्यातील बधलवाडी, नवलाख उम्ब्रे येथे घडली.

धर्माजी सोपान बधाले (वय 60, रा. बधलवाडी, नवलाख उम्ब्रे, ता, मावळ) असे जखमी वडिलांचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अकुंश धर्माजी बधाले (वय 34) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी अंकुश दारू पिऊन घरी आला. त्याने त्याचे वडील फिर्यादी सोपान यांना दारूच्या नशेत शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपी अंकुश याने लोखंडी रॉडने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या डोक्यात, पाठीवर, बरगडीवर, मांडीवर गंभीर दुखापत झाली.

त्यानंतर आरोपीने लहान भावाला देखील हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अंकुश याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.