Maval : कामशेत उड्डाणपुलाचे काम पुढील महिनाअखेर पूर्ण करणार – ठेकेदार अरुण पाटील

भ्रष्टाचाराच्या आरोपांचा केला इन्कार

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला विलंब होण्यामागची कारणे देत यावेळी निर्माण कंस्ट्रक्शनचे मालक यांनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली. हे काम तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते. मात्र, आम्ही येत्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करणार असल्याचे अरुण पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे-मुंबई महामार्गावर होत असलेल्या या पवनानगर फाटा उड्डाणपूल अनेक विषयांनी नेहमीच चर्चेचा भाग बनला असून या उड्डाणपुलाच्या सेन्टरिंग कॉन्ट्रॅक्टर असलेल्या देशमुखांनीच व्हीयुपीच्या कामात विलंब केला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी उपोषण करीत प्रशासनाला वेठीस धरीत आहेत.

तसेच मुंबई बाजुकडून येणाऱ्या लेनवर असलेल्या उच्च विजवाहक तारांचे अजूनही स्थलांतर झाले नसल्याने काम पूर्ण करता येत नसून आजपर्यंत कंपनीमार्फत 90 टक्के काम झाल्याचा दावा यावेळी कंपनीने केला असून उर्वरित काम ३१ जानेवारी २०२० पूर्वी होईल, असा विश्वास निर्माण कंस्ट्रक्शनचे अरुण पाटील यांनी व्यक्त केला.

याशिवाय माहिती अधिकार कायद्याचा धाक दाखवत व स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करीत देशमुख कंपनीला त्रास देत असल्याचे स्पष्ट केले. आमचे कामशेत उड्डाणपुलाचे व वडगाव सेवारस्त्याचे काम आम्ही पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वैयक्तिक स्वार्थासाठी प्रशासनाला आणि कंपनीला वेठीस धरून त्यांच्या मुळेच या दोन्ही कामाला उशीर झाल्याचा पाटील यांनी आरोप केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.