BNR-HDR-TOP-Mobile

Maval : पार्थ पवार यांच्या प्रचाराचा आजपासून धडाका; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मावळात फौजफाटा

बारामती, बीड, उस्मानाबादसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते शहरात दाखल

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआयचे कवाडे, गवई गटाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा आजपासून धडाका सुरु झाला आहे. बारामती, बीड, उस्मानाबादसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मावळ मतदारसंघात दाखल झाले असून त्यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या (गुरुवारी) तळेगाव दाभाडे येथे जाहीर सभा होणार आहे.

पवार घराण्यातील उमेदवार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मनापासून प्रचार करत आहेत. कुटुंबातील उमेदवार असल्याने पवार घराण्याची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: प्रचार यंत्रणा हाती घेतली आहे. बारामतीचे काल मतदान संपले आहे. त्यामुळे बारामतीतील कार्यकर्त्यांचा फौजफाटा शहरात दाखल झाला आहे. त्या सोबतच बीड, उस्मानाबाद, सोलापूरसह राज्यातील इतर भागातील पक्षाचे कार्यकर्ते देखील मावळ मतदारसंघात दाखल झाले आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी चिंचवड मतदारसंघात ‘बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण चिंचवड मतदारसंघात रॅली काढण्यात येणार आहे. पार्थ यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या (गुरुवारी) तळेगावदाभाडे येथे जाहीर सभा होणार आहे.

त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या काळेवाडी आणि दापोडीत दोन सभा होणार आहेत. युवती अध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या देखील सभा होणार आहेत. त्याचबरोबर महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा, माजी मंत्री फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण या देखील कोपरा सभा घेत आहेत. शेवटच्या चार दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारावर भर दिला आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3