Maval : आंदर मावळातील इंद्रायणी पूल पाण्याखाली; पुलावरून होणारी वाहतूक बंद

एमपीसी न्यूज- टाकवे बु।। येथील इंद्रायणी पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. आंदर मावळमध्ये येण्यासाठी सर्व नागरीकांनी कल्हाट मार्गावरुन प्रवास करावा, असे सांगण्यात येत आहे.  अलिकडून टाकवे ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर लावला आहे. तर पलीकडून दगडी लावल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.

मुख्य रस्ता टाकवे येथील इंद्रायणी पूल अंदर मावळमधील 40 ते 42 गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या पुलावरील वाहतूक बंद झाल्याने 40 ते 42 गावांचा संपर्क तुटला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.