Maval : मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बारणे यांनाच निवडून द्या – आमदार प्रशांत ठाकूर

एमपीसी न्यूज – जगात सर्वांत वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. देशात अनेक नवनवीन उपक्रम योजना राबविणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाला जगात तोड नाही. त्यामुळे देशहितासाठी तेच पुन्हा पंतप्रधान होणे गरजेचे आहे म्हणून मावळातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनाच निवडून देणे आवश्यक आहे, असे मत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले.

वावंजे नेरे जिल्हा परिषद विभागात शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल ग्रामीण भागात प्रचार दौरा केला. यामध्ये नेरे येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख शिरीष घरत, तालुका अध्यक्ष अरुण भगत, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा शेळके, अमित जाधव, रमेश जाधव, माजी महापौर दत्ता दळवी, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, भुपेंद्र पाटील, तानाजी खंडागळे, रामदास पाटील, परेश पाटील, भरत पाटील, शांताराम कुंभार, शंकर देशेकर, एकनाथ पाटील, सुरेश भोपी, संजय पाटील, एकनाथ देशेकर, शिवाजीराव दुर्गे, प्रल्हाद केणी, नरेश पाटील, वासुदेव गवते, महादेव गडगे, शेखर शेळके, राजेश भालेकर, भालचंद्र शिनारे, तुकाराम पाटील, सुनील शेळके, विश्वजित पाटील, धनंजय पाटील, धनंजय म्हात्रे, पांडुरंग केणी, अनंता कडू, तुषार दुर्गे आदी उपस्थित होते.

आमदार ठाकूर म्हणाले, “येत्या काही वर्षात भारत देश स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करीत आहे. यानिमित्त देशाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्याचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. स्वच्छ भारत ही संकल्पना राबवत असताना प्रत्येक घरात शौचालय, स्वच्छता याबाबत अनेक योजना, सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, शेतकऱ्यांसाठी हमीभाव, बांधकाम व्यावसायिकांच्या फसवणुकीतून सुटण्यासाठी रेरा कायदा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. देशातल्या नागरिकांना केवळ विकास हवा आहे. तो विकास फक्त नरेंद्र मोदी हेच करू शकतात. त्यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करणे आवश्यक आहे. श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

बाळासाहेब पाटील म्हणाले, “मावळ आणि रायगड हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अभेद्य आहे. कोणीही त्याला फोडू शकत नाही. खासदार बारणे यांनी मागील पाच वर्षात नरेंद्र मोदी यांना सक्रियपणे साथ दिली आहे. ही साथ अशीच ठेवण्यासाठी त्यांना विजयी करायचे आहे. खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघात केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना राबविल्या. विरोधकांचे काहीही काम नसताना ते केवळ पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत. भ्रष्टाचार करून कामावलेला पैसा शापित झाला आहे. अशा शापित पैशांच्या पावसात भिजू नका, असा सल्लाही पाटील यांनी यावेळी दिला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्या देशाची मान उंचावणारा पंतप्रधान मिळाला आहे. याचा एक भारतीय म्हणून अभिमान वाटतो. भ्रष्टाचाराने बदनाम झालेल्या राष्ट्रवादी पक्षाला नागरिकांनी नेस्तनाबूत केले आहे. त्यांना मागील कित्येक वर्षात एकही उमेदवार तयार करता आलेला नाही. उमेदवार नसल्याने त्यांना घरातला उमेदवार देण्याची वेळ आहे. येत्या काही दिवसात राष्ट्रवादी कडून समाजात फसवं चित्र निर्माण करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी त्यात फसू नये. प्रत्येक मतदाराकडे चांगली दृष्टी आहे. आपल्या कल्पकतेचा वापर करून चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावे, असेही बारणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.