Maval : खासदार बारणे यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज- महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सहपरिवार मतदान केले. थेरगाव येथील संचेती शाळेत त्यांनी मतदान केले.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज (सोमवारी) आहे. मतदानाला सकाळी सात पासून सुरुवात झाली. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी साडेआठच्या सुमारास थेरगाव येथील संचेती शाळेत मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत बारणे यांच्या पत्नी सरिता बारणे, पुत्र विश्वजित बारणे, प्रताप बारणे आणि स्नुषा स्नेहा बारणे यांनी मतदान केले.

माध्यमांशी बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले, मतदार राजा महायुतीला कौल देणार आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी त्यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक हरल्यानंतर राजकीय संन्यास घेण्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आता राजकीय सन्यासाची तयारी करावी. वाढलेला मतदार विकासाला मतदान करणार आहे. तो कोणत्याही भूलथापांना किंवा अन्य प्रलोभनांना बळी पडणार नाही. महायुतीचा 2 लाखांच्या मताधिक्याने महायुतीचा विजय होणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.