Maval : चिंचवडचाच खासदार होण्यासाठी बारणे यांना विक्रमी मताधिक्य द्या – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – उमेदवारी वाटीतून गेली असली तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातीलच उमेदवार असल्याने ती ताटात आली आहे. त्यामुळे अशी ताटात आलेली खासदारकी बाहेर जाऊ द्यायची नाही. चिंचवडचाच खासदार होण्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी कार्यकर्त्यांना केले.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप-रिपाइं-रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि.22)थेरगावात कोपरा सभा झाली. त्यावेळी जगताप बोलत होते. नगरसेविका अर्चना बारणे, नगरसेवक निलेश बारणे, अभिषेक बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, काळूराम बारणे, तानाजी बारणे उपस्थित होते.

माझ्यापेक्षा लहान असलेल्या सहका-यांनी उमेदवारी वाटीतील गेली असली तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातीलच उमेदवार असल्याचे ती ताटात आल्याचे सांगितले. माझ्यापेक्षा छोट्या कार्यकर्त्यानी एवढे मोठे मन केले. त्यांच्यामुळे मी देखील मोठे मन केले. गतकाळात जे-जे झाले, ते आपल्या परिसरातील विकासासाठी सर्व मतभेद विसरायचे ठरविले. त्यानंतर बारणे आणि माझ्यामध्ये मनोमिलन झाल्याचे सांगत लक्ष्मण जगताप म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे खासदारांचे मोठे संख्याबळ आवश्यक आहे. त्यांच्या मागे उभा राहणा-या खासदारांमध्ये आपल्यातील एक खासदार उभा असला पाहिजे”

आपला खासदार विक्रमी मताने निवडून आलेला असावा. यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. धनुष्यबणाच्या चिन्हावर श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताने लोकसभेत पाठवायचे आहे. त्यासाठी सहा विधानसभा मतदारसंघापैकी घरचा मतदारसंघ असलेल्या चिंचवड मतदार संघातून सर्वांत जास्त मताधिक्य दिले पाहिजे. सर्वांनी स्वत: उमेदवार आहोत, असे समजून काम करायचे आहे. महाराष्ट्रातीन एक नंबरचे मतदान आपल्या उमेदवाराला होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. बारणे यांना विक्रमी मताने लोकसभेत पाठवावे, असे आवाहन जगताप यांनी केले.

जगताप म्हणाले, “केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला. पंतप्रधान आवास योजना, अमृत योजना, 24 X 7 ही पाणीपुरवठ्याची योजना शहरात सुरु आहे. केंद्र सरकार या योजनांना सहकार्य करत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारशी निगडीत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. खासदार निधीतून शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील गाळ त्यांनी काढला. त्यामुळे जास्तीचा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यांची संसदेतील कामगिरी उल्लेखनीय असून सलग पाच वर्ष त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मतदारसंघाचा लौकिक वाढला आहे. हा लौकिक वाढविण्याचा आपणही प्रयत्न करायचा आहे”

थेरगाव परिसरातील विकासासाठी जेवढे जास्तीचे देता येईल. तेवढे जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. गतकाळात आपणच आपले विरोधक आणि सत्ताधारी होते. आता परिस्थिती सुधारणार आहे. महापालिका भाजप आणि मित्र पक्षांची एकहाती ताब्यात राहणार आहे. त्यामुळे मागील काळात जो विकास राहिला आहे. तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. या विकासाचा फायदा परिसरातील शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहचविता येईल. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असेही जगताप म्हणाले.

नगरसेवक अभिषेक बारणे म्हणाले, “महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते मनापासून परिश्रम करत आहे. आपल्या परिसरातील उमेदवाराला विक्रमी मताने निवडून आणणार आहोत. थेरगाव परिसरातून युतीच्या उमेदवाराला सर्वांत जास्त मताधिक्य देण्यासाठी आम्ही प्रयत्ननशील आहोत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.