Maval : बाबाराजे देशमुख ठरले उमेदवारी अर्ज घेणारे पहिले उमेदवार

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून चर्चेत असलेले बाबाराजे गणपतराव देशमुख यांनी आज, मंगळवारी उमेदवारी अर्ज स्वीकारला.

यावेळी उपस्थित असणाऱ्या पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की मला छत्रपतींचे गडकोट, बौद्ध लेण्या, ऐतिहासिक वास्तू यांचा जीर्णोद्धार, तरुणांना रोजगार देणे, रस्ते, वीज, पाणी, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे, पनवेलमध्ये चालू असलेल्या डान्सबारमधील नंगानाच या विरुद्ध आवाज उठवणे, त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघातील पर्यटन वाढवणे व विकास करणे, विद्यार्थीवर्गाचे प्रश्न,  बेरोजगारांचे प्रश्न, बैलगाडा शर्यतीवरील वरील बंदी, तसेच सर्व जाती वरील आरक्षण इत्यादी रखडलेल्या समस्या सोडवण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेलो आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.