Maval: संरक्षण खात्याच्या डीआरडीओ प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला मिळावा – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सरंक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची आज (बुधवारी) भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत तळेगाव दाभाडे येथील संरक्षण खात्याने डीआरडीओ प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा तात्काळ मोबदला शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी करणारे निवेदन सरंक्षण राज्यमंत्र्यांना दिले.

 

_MPC_DIR_MPU_II
याप्रसंगी सरंक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी संरक्षण खात्याने डीआरडीओ प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा अहवाल राज्यसरकाने केंद्रसरकारकडे सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.