Maval : बाळासाहेब नेवाळे व दत्तात्रय शेवाळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक बाळासाहेब नेवाळे आणि मावळ पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे मानले जाते.

मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रचारासाठी तळेगाव दाभाडे येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा झाली. त्यात नेवाळे व शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मावळ विधानसभा मतदारसंघात नेवाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलून पक्षाने भाजपमधून आलेल्या सुनील शेळके यांना उमेदवारी दिली. त्यानंतर नेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडत, पक्षाने ग्रामीण भागाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेवाळे यांचा भरसभेत पाणउतारा केला होता. त्यानंतर नेवाळे यांनी त्यांच्या पदांचे राजीनामे देत राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. कार्यकर्त्यांनी मनधरणी केल्यानंतर नेवाळे यांनी राजकारण संन्यासाचा निर्णय मागे घेऊन आज त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.