BNR-HDR-TOP-Mobile

Maval: पवार घराण्याचा पहिला पराभव माझ्याकडून होणार – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महायुतीच्या बाजुने आपला कौल दिला आहे. त्यामुळे मी निश्चित आहे. दीड ते दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल, असा ठाम विश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त करत पवार घराण्याचा पहिला पराभव माझ्याकडून होणार आहे, असेही ते म्हणाले.

मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया उद्या (गुरुवारी) सकाळी आठ वाजल्यापासून बालेवाडी येथे होणार असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. मावळमध्ये शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे आव्हान आहे. मावळातील निकालाकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच मतमोजणीच्या पूर्वसंध्येला बारणे यांनी विजयाचा दावा केला आहे.

श्रीरंग बारणे म्हणाले, “मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, उरण आणि कर्जत या सहाही विधानसभा मतदारसंघात मला चांगले मताधिक्य मिळेल. त्यामुळे मला कसलीही धाकधूक नसून मी निश्चित आहे. मी विजयी होणार याची मला पूर्ण खात्री असून पवार घराण्याचा पहिला पराभव माझ्याकडून होणार आहे.

.