Maval : बेगडेवाडी ते तळेगाव-चाकण हायवे माळवाडी रस्त्यातील खड्डे नगरसेवक रघुवीर शेलार यांनी स्वखर्चातून बुजवले!

एमपीसी न्यूज – बेगडेवाडी ते तळेगाव-चाकण हायवे माळवाडीपर्यंत जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला होता. या रस्त्यातील खड्डे नगरसेवक रघुवीर शेलार यांनी स्वखर्चातून बुजवले. हा रस्ता केल्याबद्दल डिओडी डेपोच्या वतीने कामगार नेते पंडितराव बालघरे यांनी नगरसेवक रघुवीर शेलार यांचे आभार मानले.

बेगडेवाडी ते तळेगाव-चाकण हायवे माळवाडी या रस्त्यात खड्डेच खड्डे झाले होते. हा डिओडी डेपो जाणाऱ्या कामगारांना तसेच माळवाडी ,कोटेश्वर वाडी, इंदोरी आदी ठिकाणच्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी डिओडी डेपोचे कामगार नेते अजित शेलार आणि सहकाऱ्यांनी नगरसेवक रघुवीर शेलार यांच्याकडे केली.

त्यानंतर नगरसेवक रघुवीर शेलार यांनी स्वखर्चातून जेसीबी ट्रॅक्टरच्या साह्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले. यावेळी कामगार नेते अजित शेलार, नगरसेवक रघुवीर शेलार, पांडा भाऊ करंडे, दीपक भाऊ दाभाडे ,राहुल भेगडे ,काळोखे साहेब, सलीम शेख ,प्रफुल शेलार, अनिल शेलार,अक्षय शेलार ,योगेश शेलार,सचिन भेगडे, अभिजीत शेलार, प्रशांत शेलार तसेच डिओडी डेपोतील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.