Maval BJP : मावळ भाजपाची भव्य तिरंगा रॅली

एमपीसी न्युज – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (Maval BJP) वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमाटणे फाटा ते कामशेत अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यामध्ये तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. 
मावळ तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे व विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांच्या प्रमुख संयोजनातून ही रॅली काढण्यात आली.
 
भारत माता की जयच्या घोषणा व फटाक्यांची आतषबाजी करत मंगलमय वातावरणात भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने सोमाटणे फाटा ते कामशेत अश्या भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. या रॅलीमध्ये तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहाने स्वतःची टू व्हीलर व त्यावर तिरंगा ध्वज लाऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सोमाटने फाटा येथून या रॅलीस सुरूवात (Maval BJP) करून पुढे तळेगाव शहर,वडगाव, कान्हे फाटा, नायगाव व कामशेत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रमुख मान्यवरांच्या भाषणाने रॅलीचा शेवट करण्यात आला.
याप्रसंगी हर घर तिरंगा अभियान संयोजक गुलाबराव म्हाळसकर,ज्येष्ठ नेते माऊली शिंदे,राजाराम शिंदे,प्रशांत ढोरे, शांताराम कदम,तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, युवा नेते गणेश ठाकर, रवि शेटे यांच्यासह सर्व आघाड्यांचे, भागाचे, गणाचे अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.youtube.com/watch?v=5yoMvlQZyx8

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.