Maval : भाजपला मावळ मतदारसंघ मिळण्याची शक्यता कमी; युतीचा धर्म पाळणार – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – शिवसेना मावळ लोकसभा मतदार संघ सोडायला तयार नाही. त्यामुळे मतदार संघ भाजपला मिळण्याची शक्यता कमी असून निवडणुकीत मी युतीचा धर्म पाळणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच अर्ज भरेपर्यंत मावळवरचा दावा सोडणार नसल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.

मावळ लोकसभा मतदार संघ भाजपला सोडण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील निवेदन देण्यात आले होते.

याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, ” मावळ लोकसभा मतदार संघ सोडायला शिवसेना तयार नाही. त्यामुळे मतदार संघ मिळण्याची शक्यता कमी आहे. निवणुकीत मी युतीचा धर्म पाळणार आहे. तसेच मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघावरील उमेदवारी अर्ज भरेपर्यंत दावा सोडणार नाही ” असेही ते म्हणाले.

त्याचप्रमाणे शिवसेनेने महापालिकेच्या सत्तेत सहभाग मागितल्यास त्यांना सहभागी करून घेण्यात येईल. महापालिकेत अनेक विषय समित्या आहेत, असेही जगताप यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत पाच वर्षांत 55 नगरसेवकांना संधी देण्यासाठी गतवर्षी एकवर्ष पूर्ण झाल्यानंतर सदस्यांचे राजीनामे घेतले होते. परंतु, यावेळी घेतले नाहीत. याबाबत विचारले असता जगताप म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारून राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.