Maval: भाजयुमोने शरद पवार यांना पाठवली ‘जय श्रीराम’ लिहिलेली एक हजार पत्रे

Maval: BJP Yuva Morcha sent a thousand letters to Sharad Pawar with 'Jai Shriram' written on them

एमपीसी न्यूज – मावळ तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज वडगाव येथील पक्ष कार्यालयामध्ये खासदार शरद पवार यांनी केलेल्या राम मंदिरावरील खोचक टिप्पणीसंदर्भात त्यांचा निषेध नोंदवून त्यांना मावळ तालुका युवा मोर्चाच्या वतीने एक हजारपेक्षा जास्त जय श्रीराम असे लिहलेले पत्रे पाठवण्यात आली आहे.

अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीतीत प्रभू श्रीराम मंदिराचे 5 ॲागस्टला भूमिपूजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टिप्पणी करणे समयोचित नव्हते, असे माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे म्हणाले.

या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, प्रभारी ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम, युवामोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, जि.प. सदस्य नितीन मराठे, तालुका संघटनमंत्री किरण राक्षे, विकास शेलार, बाबूलाल गराडे, रामदास गाडे, प्रदीप धामणकर, अविनाश गराडे, सरचिटणीस सुनील चव्हाण, सरचिटणीस मच्छिंद्र केदारी, वडगावचे माजी सरपंच नितीन कुडे, विकास लिंबोरे, नामदेव वारिंगे, योगेश म्हाळसकर यांच्यासह युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.