Maval: शेतकऱ्यांना पीककर्जाच्या वाटपासाठी भाजपचे जिल्हा बॅंकेस निवेदन

Maval: BJP's statement to district bank for distribution of crop loans to farmers निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत त्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्याची मागणी मावळ तालुका भाजपने केली आहे.

एमपीसी न्यूज- खरीप हंगाम चालू होऊनही मावळ तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना अद्याप पीककर्जाचे वाटप झालेले नाही. तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत त्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्याची मागणी मावळ तालुका भाजपने केली आहे.

सरकारने जाहीर केलेली दोन लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणारे शेतकरी यांना जाहीर केलेले 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान याबाबत प्रत्यक्षात दिलेल्या मदतीची खरी माहिती प्रसिद्ध करावी व पात्र शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी. या व इतर काही मागण्यांचे निवेदन मावळ तालुका भाजपच्या वतीने इंदोरी येथील बँक ऑफ महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदोरी शाखेच्या शाखाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, सरचिटणीस सुनील चव्हाण, पुणे महानगर नियोजन समिती सदस्य संदीप काशिद, इंदोरी पंचायत समिती गणाचे अध्यक्ष संदीप पवार, इंदोरी शहराध्यक्ष जगन्नाथ शेवकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष रमण पवार, विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष संस्कार चव्हाण, साईनाथ बाणेकर, नवनाथ पानसरे, मनोहर भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप नाटक, वासुदेव ऊबाळे, रमेश ठाकर, बंडोपंत नाटक, बाळासाहेब ढोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.