BNR-HDR-TOP-Mobile

Maval: पंचायत समिती सभापतिपदी भाजपच्या सुवर्णाताई कुंभार, उपसभापतीपदी जिजाबाई पोटफोडे बिनविरोध

एमपीसी न्यूज – मावळ तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपाच्या सुवर्णाताई संतोष कुंभार तर, उपसभापतिपदी जिजाबाई नामदेवराव पोटफोडे यांची आज बिनविरोध निवड झाली.

यापूर्वीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर आणि उपसभापती शांताराम कदम यांनी पक्षादेशाप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक झाली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रांतअधिकारी सुभाष बागडे, तहसीलदार रणजीत देसाई आणि बीडीओ शरदचंद्र माळी यांनी काम पाहिले.

  • मावळ भाजपच्या वतीने आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे अभिनंदन केले. त्यावेळी पक्षाचे मावळ तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भेगडे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, दत्तात्रय शेवाळे, साहेबराव कारके, नंदाताई सातकर, मावळ तालुका आरपीआय अध्यक्ष नारायण भालेराव, सुनील शेळके, बाळासाहेब घोटकुले,लोणावळा नगराध्यक्ष सुरेखा जाधव,किरण भिलारे, अनंता कुडे,यदुनाथ चोरघे, सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

सूत्रसंचालन शांताराम कदम यांनी केले. तर आभार बाळासाहेब घोटकुले यांनी मानले. तसेच यावेळी पुलवामा,जम्मू काश्मीर या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मिरवणूक देखील रद्द करण्यात आली.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like